- Activities
- Chicholi
- 24 March 2026
- 412 Less than a minute
३ दिवशीय रहिवासी धम्म आचरण शिबीरचे आयोजन
दिनांक ०१ मार्च २०२६ ला शांतीवन धम्मजय बुद्ध विहार चिचोली [नागपूर ] व डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझिअम चिचोली यांच्या सौजन्याने ३ दिवशीय रहिवासी धम्म आचरण शिबीरचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरामध्ये वाट फ्रा धम्मकाय टेम्पल, थायलंड येथील पूज्यनीय भदंत सुमंगल यांच्या मार्गदर्शनात शिबीर रूपरेखा आखण्यात आलेली होती. भारतात प्रथम वाट फ्रा धम्मकाय टेम्पल, थायलंड शाखेच्या रुपात अस्तित्वात आलेली असून संपूर्ण जगातील 250 शाखेत होणारी आमीस पूजा चे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरामध्ये एकूण ५० शिबिरार्थी यांनी भाग घेतला असून ०३ मार्च २०२६ ला समापन आणि माघ पौर्णिमेचा औचित्य साधून १००० दीप पुजा चे आयोजन करण्यात आले होते यात असंख्य उपासक तथा उपासिका यांनी सहभाग नोंदविला होता.
भारतात प्रथमतःच या दीप पूजेचे आयोजन करण्यात आले.































