- News & Events
- Chicholi
- 29 November 2024
- 81 Less than a minute
शांतीवन चिंचोलीत, नानकचंद रत्तु यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळा संपन्न
परम पूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटचे सहकारी आणि निजी सचिव दिवंगत आधुनिक भन्ते आनंद नानकचंद रत्तु यांच्या 100 व्या जन्म दिवसा निमित्त शांतीवन चिंचोली येथे भारतीय बौद्ध परिषदेच्या वतीने जन्म शताब्दी वर्ष सोहळा साजरा करण्यात आला.
या सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी सामाजिक कार्यकर्ते तथा विश्वस्त मोतीलाल नाईक होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध नाटककार आयु. संजय जीवने, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद खोब्रागडे, भोलाजी लवात्रे, शेखर गोडबोले इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून तथा दिवंगत रत्तुजी यांच्या अस्थिकलशाचे पूजन व प्रतिष्ठापना करून करण्यात आली. या सोहळ्याचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले प्रास्ताविक मध्ये एकूण रत्तुजी यांच्या जीवन कार्याचा प्रवास यावर प्रकाश टाकण्यात आला.
प्रमुख पाहुणे आयु. संजय जीवने यांनी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रत्तुजी यांचेतील संबंध जे नेहमी समाजाला मार्गदर्शक ठरतील व कायम दिशा देत राहतील असे विशद केले.
अध्यक्ष मोतीलाल नाईक यांनी त्यांचे व रत्तुजी यांचे संबंध तथा एकूण त्यांच्या सामाजिक व धार्मिक योगदानाबद्दल माहिती विशद केली. यानंतर भीमबुद्ध गीतांचा संगीतमय कार्यक्रम नरेश चोखान्द्रे आणि संच यांनी सादर केला .
कार्यक्रमाचे संचालन प्रदीप लामसोंगे तर भारतीय बौद्ध परिषद वतीने आभार प्रकाश सहारे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शशी राऊत, प्रा. संजय कावींदे, चंद्रमनी लावत्रे, प्रवीण पाटील, राहुल भैसारे, धर्मपाल दुपारे, माधवी सरोदे, इत्यादींनी परिश्रम घेतले.