- News & Events
- Chicholi
- 26 November 2024
- 90 Less than a minute
नागपुरातील चिचोलीत बाबासाहेबांच्या वस्तूंचा संग्रह
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वस्तू नागपूरजवळील चिचोली येथे संग्रह करून ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली नाही. त्यामुळं या वस्तू सुमारे १०० वर्षे टिकणार आहेत. 98 टक्के वस्तूंवरील रासायनिक प्रक्रिया पूर्ण झालीय.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती. या जयंती निमित्ताने बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या ऐतिहासिक वस्तूंची आठवण झाल्यावाचून राहत नाही.
या सर्व वस्तू नागपूर जिल्ह्यातील चिचोलीच्या संग्रहालयातील वातानुकुलित खोलीत सीलबंद करुन ठेवण्यात आल्यात. या सर्व वस्तू लवकरच संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
बाबासाहेब ज्या खुर्चीवर बसून लिखान करायचे, वाचन करायचे ती खुर्ची. बाबासाहेब लिहायचे ते नोटबुक. बाबासाहेबांचा स्टॅम्प, त्यांची पेंटिंग. त्यांनी वापरलेल्या लाकडी अलमारी.
या सर्व ऐतिहासिक वस्तू नागपूर शेजारी चिचोली येथे ठेवण्यात आल्यात. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेला टाइपरायटर आता पुढचे 100 वर्षे टीकणार आहे.
बाबासाहेबांनी वापरलेल्या 350 वस्तू आता चिरकाल टिकणार आहेत. यापैकी 98 टक्के ऐतिहासिक वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया पूर्ण झालीय. त्यासाठी सुसज्ज असं संग्रहालय तयार करून ठेवण्यात आलंय.