- News & Events
- Chicholi
- 29 November 2024
- 85 Less than a minute
शांतिवन चिंचोली येथे धम्मसेनापती वामनराव गोडबोले यांचा जन्मशताब्दी सोहळा
नागपूर, प्रति: परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर मारोतीराव गोडबोले अशी समापन सोहळा २०२२-२३ यांचे निकटचे सहकारी धम्मसेनापती वामनराव गोडबोले जन्मशताब्दी यांचा सोहळा संपन्न झाला.
शांतिवन चिंचोली येथे सकाळी 10:00 वाजता शांतीवन येथील बाबासाहेबच्या व धम्मसेनापती यांच्या अस्थीकलशाला मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी भारतीय बौद्ध परिषदेचे पदाधिकारी आणि पूज्य भन्ते कौन्डीण्य उपस्थित होते. दुपारी 1 वाजता जन्मशताब्दी सोहळ्यास सुरवात करण्यात आली.
अध्यक्ष स्थानी प्रल्हाद खोब्रागडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनिअर महेंद्र गायकवाड धम्मप्रचारक, हेमंत वाघमारे प्रकल्प अधिकरी, मोतीलाल नाइक, शेखर गोडबोले विश्वस्त आदी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी पाहुण्यांनी धम्मसेनापती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा सहवास आणि एकूण जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. प्रस्ताविकात शांतिवन चिंचोली चा संपूर्ण इतिहास व प्रकल्प विकासात होणारी प्रगती याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रदीप लामसोंगे, तर आभार प्रकाश सहारे यांनी केले.
यानंतर संविधान जागार या बद्दल एक लघु नाटीका सादर करण्यात आली शेवटी डॉ. लिहीतकर आणि संच यांनी भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे उत्साह वाढविला.
कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश सहारे, संजय चहांडे, प्रा. संजय कायिंडे, चंद्रमनी लावत्रे, राजेश नानवटकर, प्रा. शशी राऊत, प्रवीण पाटील, धर्मपाल दुपारे, राहूल भैसारे, यांनी प्रयत्न केले.